Friday, April 25, 2025
Homeनगरखून प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

श्रीगोंदा न्यायालयाचा निकाल || कर्जत तालुक्यातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून रावसाहेब काळे (रा. रेहकुरी, ता. कर्जत) यांना जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी धनराज बाबुराव काळे (वय 60 रा. रेहकुरी, ता. कर्जत) याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी भा.दं.वि. कलम 302 अन्वये जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठवली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी कामकाज पाहिले.

- Advertisement -

रावसाहेब काळे हे कुटुंबासह रेहकुरी शिवारात शेत राखणीचे काम करत होते. धनराज काळे हा देखील त्याच शिवारात राहत होता. धनराज हा रावसाहेब यांना तु रेहकूरी शिवारात राहू नको, असे म्हणत वाद घालत असे. दि. 14 एप्रिल 2008 रोजी रात्री एकच्या सुमारास रावसाहेब घराबाहेर झोपलेले असताना धनराजने तुला मी मारणार आहे, असे म्हणून डोक्यावर दगड मारला, रावसाहेब बेशुध्द पडल्याने त्यांच्या पत्नीने आरडा-ओरडा केला. राम ठोबळे व ताराबाई ठोबळे यांनी धनराज यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जखमी रावसाहेब यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक आर. एन. हजारे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मयताचा जबाब व डॉक्टरांची साक्ष तसेच प्रत्यक्षदर्शी मयताची पत्नी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील कापसे-गायके यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व साक्षी पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठवली. सरकार पक्षास पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार आशा खामकर, डी. एन. शिरसाट व सुजाता गायकवाड यांनी सहकार्य केले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी धनराज बाबुराव काळे हा बर्‍याच दिवसांपासून पसार होता. त्याला शोधून काढण्यासाठी महिला पोलीस अंमलदार आशा खामकर यांनी प्रयत्न करून आरोपीला कोर्टात हजर केल्यामुळे 18 वर्षापूर्वीचे हे प्रकरण निकाली निघण्यासाठी मदत झाल्याने न्यायालयाने खामकर यांचे कौतुक केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...