Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीत एका युवकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णनगर परिसरात एका युवकाची (Youth) त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरात एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत अशोक तोडकर (वय २८) रा. आदर्शनगर, रामवाडी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवक हा रिक्षाचालक चालक असून तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. सदर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बोलले जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता. पंरतु, रात्री तो घराबाहेर पडला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून (Police) त्याचा खून झाल्याची घटना समजली. सदर युवकाच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण आणि आई वडील असा परिवार आहे.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Kiran Kumar Chavan) सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....