Wednesday, May 8, 2024
HomeनाशिकNashik Crime News : पिंपळगाव बसवंत येथील वीटभट्टी परिसरात महिलेची हत्या

Nashik Crime News : पिंपळगाव बसवंत येथील वीटभट्टी परिसरात महिलेची हत्या

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

येथील निफाड रोडवरील (Niphad Road) वीटभट्टी परिसरात विवाहित महिलेची ( Married Woman) हत्या (Murder) झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. निफाड रोडवरील वीटभट्टी परिसरात कायमच गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी लोक व्यवसाय व कामाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत…

- Advertisement -

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील निफाड रोडवरील वीटभट्टी (Brick Kiln) येथे कामानिमित्त राहण्यासाठी आलेल्या भारती सुरेश पवार (वय २६) या महिलेचा बुधवार (दि. २३ नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास मृतदेह (Dead Body) वीटभट्टी परिसरातील नदी किनारी आढळून आला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना (Police) संपर्क केला असता घटनास्थळी तात्काळ पोलीस व रुग्णवाहिका दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Nashik News : पाथर्डी परिसरात बिबट्या जेरबंद

त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह पावले रुग्णवाहिकेतून येथील सरकारी रुग्णालयात (Hospital) नेला असता डॉक्टरांनी तपासून त्या महिलेला (Women) मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जोपुळ रोड येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. तर हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Manoj Jarange Patil : “२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास…”; जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

- Advertisment -

ताज्या बातम्या