Thursday, May 9, 2024
Homeधुळेदहिवेल येथे गळफास देवून तरूणाचा खून

दहिवेल येथे गळफास देवून तरूणाचा खून

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील दहिवेल (Dahivel) येथे जागेच्या वादातून हत्याराने डोक्यावर मारहाण करत व गळफास देवून तरूणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिता-पुत्रा विरोधात साक्री (Sakri) पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

साहेबराव काशिनाथ पाटील (वय 31 रा. दहिवेल) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांची बहिणी सुलोचना सुदाम पाटील (वय 37 रा. कोरवाडे ता. साक्री (sakri) ह.मु कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई) यांनी साक्री पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, पुर्वीचे जागेच्या वादातून मनात राग धरून धनराज वंजी माळी व त्याचा मुलगा सचिन माळी (रा. दहिवेल) या दोघांनी रावसाहेब पाटील त्यांच्या गावातील घराचे बांधकाम सुरू असलेल्या तळघरात नेले.

तेथे हत्याराने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली. तसेच गळफास देवून गंभीर दुखापती केले. त्यानंतर संशय येवू नये म्हणून दोघांनी साहेबराव यास परस्पर दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

तेथून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेले. दि.16 मे रोजी उपचार सुरू असतांचा रावसाहेब पाटील याचा मृत्यू झाला. त्याला वरील दोघांनीच हत्याराने मारहाण करून त्याचा खून केला. पिता-पुत्रावर भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या