Sunday, May 19, 2024
Homeधुळेपंचायत समिती सदस्यांचा खून

पंचायत समिती सदस्यांचा खून

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील तरडी गावात पंचायत समिती सदस्य बाळु गायकवाड यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करीत खून केल्याची घटना काल दि.17 रोजी सायंकाळी घडली होती. हल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारदरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी हल्ला करणार्‍या चुलत पुतण्यावर थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची संशयीताला अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत उमेश बाळु गायकवाड (रा.तरडी ता.शिरपूर) याने थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचायत समिती सदस्य बाळू बुधा गायकवाड (वय 50) यांचा मुलगा तरडी गावात रेशन दुकान चालवतो. काल 17 रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान बाळु गायकवाड हे घरोघरी लाभार्थींना धान्य वितरणाची पावतीचे वाटप करीत होते. या दरम्यान ते चुलतभावाच्या घरी आले.

येथे चुलत पुतण्या गोपाल भागवत गायकवाड (वय 27) याने आपल्याला रेशनचे धान्य देत नसल्याचा गैर समज करुन घेत बाळू गायकवाड आणि मुलगा उमेश यांच्याशी वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत घरातून कुर्‍हाड आणून बाळू गायकवाड यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत करीत प्राणघातक हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळु गायकवाड यांना तत्काळ शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने रात्रीच त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी गोपाल भागवत गायकवाड (रा.तरडी) याच्याविरुध्द भादवि कलम 307 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होतो. दरम्यान बाळु गायकवाड यांचा रात्रीच उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गुन्ह्यात वाढीव भांदवी 302 कलम वाढविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या