Thursday, May 2, 2024
Homeजळगावअनैतिक संबंधातून दोघांचा खून

अनैतिक संबंधातून दोघांचा खून

जळगाव । Jalgaon

शहरातील समता नगर परिसरात पत्नीच्या अनैतिक संबधातून (immoral relationship) पतीने पत्नीच्या (Wife) प्रियकराची तर त्यानंतर अवघ्या काही तासातच शिवाजी नगर हुडको परिसरात प्रियसीसोबत असलेल्या प्रियकराने दुसर्‍या प्रियकराचा खून केल्याच्या दोन घटना शुक्रवारी घडल्या. खून करणार्‍या संशयितांना संबंधित पोलिसांनी (police) अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील समता नगर परिसरात राहणार्‍या सागर पवार याचे याच परिसरात राहणार्‍या विवाहितेशी अनैतिक संबंध होते. याच कारणावरुन विवाहितेच्या पतीने त्याच्या पत्नीचा प्रियकर सागर नरेंद्र पवार (वय-28) याच्या मानेवर चाकूने सपासप वार करीत त्याचा खून केला.

परिसरात आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सागरला तात्काळ उपचारसाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात (District Medical Hospital) दाखल केले. दरम्यान, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू (Death) झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयित अजित नारायण खरे याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध किरण दादाराव अडकमोल यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

एका प्रियकराकडून दुसर्‍या प्रियकराचा खून

दुसर्‍या एका घटनेत विवाहित प्रेयसी तिच्या दुसर्‍या प्रियकरासोबत घरात एकत्र दिसताच संतापाच्या भरात दुसर्‍याचा खून केला. नरेश आनंदा सोनवणे (वय-28, रा. राजाराम नगर, दूध फेडरेशन) हा तरुण शिवाजी नगरात प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघे एका खोलीत बसलेले असतांना त्याठिकाणी आकाश सखाराम सोनवणे हा आला.

दरम्यान, आकाशने आपल्या प्रेयसिला नरेशच्या मिठीत बघताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले या वादातून आकाशने धारदार शस्त्राने भोसकून नरेशचा निर्घुन खून केला. याप्रकरणी आकाश सखाराम सोनवणे (वय-25, रा. इंद्रप्रस्थनगर) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या