Thursday, May 2, 2024
Homeराजकीयपुण्यात युवासेना पदाधीकार्याची हत्या

पुण्यात युवासेना पदाधीकार्याची हत्या

पुणे(प्रतिनिधि)

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी गुरुवारी मध्यरात्री कोयता आणि चाकूने यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुण्यातील बुधवार पेठेतील गवळी आळीसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दीपक हे शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. विजय मारटकर हे शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा बुधवार पेठ भागातून नगरसेवकपदी निवडून आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विजय मारटकरांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे मारटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दीपक मारटकर काल रात्री जेवणानंतर बाहेर आले. आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारटकरांचे डोळे, डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करुन हल्लेखोर बाईकवरुन पसार झाले.

दीपक मारटकर यांना उपचारासाठी पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता, तसेच बाईकला नंबर प्लेट नव्हती. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज शोधून असून अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या