Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यागानकोकिळेच्या व्यक्तिमत्वाचे गौरवगीत ‘संगीत चित्रफिती’त

गानकोकिळेच्या व्यक्तिमत्वाचे गौरवगीत ‘संगीत चित्रफिती’त

नाशिक । प्रतिनिधी

गानकोकीळा लता मंगेशकर यांचा 91 व्या वाढदिवस आहे .

- Advertisement -

वाढदिवसा निमित्त त्यांच्या थोर व्यक्तिमत्वाचे गौरवगीत जगात प्रथमच संगीत चित्रफितीद्वारे नाशिकमधून सादर केले जाणार आहे. शहरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांच्या सावंत ब्रदर्स आर्ट फाउंडेशनफ व संगीतकार, गायक संजय गिते यांच्या सोर्स म्युझिक स्टुडिओकडून चित्र व संगीत जगतातील कला संस्थांच्या समन्वयातून 28 सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही अफलातून कलाकृती सादर केली जाणार आहे.

लता मंगेशकर यांची हजारो गाणी, संगीत सर्वांना माहीत आहेत. परंतु त्यांच्या महान व्यक्तिमत्वावर आधारित एकही गाणे अद्याप नाही. करोनाच्या काळात ज्यांचा स्वर हा औषध, अमृता समान आहे. हा मूळ विचार गीतकार संजय गिते यांनी ङ्गदुःख दर्द मे दवा दुवा है, ये दुनिया मे एकही स्वर, लता मंगेशकरफ, या शब्दात मांडला.

त्यांनी दिल्लीस्थित ज्येष्ठ हिंदी कवी लक्ष्मीनारायण भाला यांच्याकडून या संकल्पनेवर पूर्ण नवे गीत लिहून घेतले. 2004 साली संजय गितेच्या संगीत दिगदर्शनासाठी लता मंगेशकर यांनी सिनेमासाठी गायन केले होते. आता मात्र साक्षात हे गाणे सिनेमासाठी नव्हे तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी आहे हे अद्वितीय गीत संजय गीतेनी हे स्वरबद्ध केले आहे.

संजय गिते आणि श्रावणी गिते यांनी सुरेल आवाजात त्याचे गायन केले आहे. तसेच या सूर सरस्वतीच्या गीत वंदनेचे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी लता मंगेशकर यांचे खास चित्रशैलीत साकारलेले पोट्रेट हे आहे. या पोट्रेट पेंटिंगची निर्मिती क्रिया आणि त्याच्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर सुमधुर गाण्याचा स्वर आस्वाद रसिकांना मिळणार आहे. लतादिदींच्या चेहर्‍यावरील निखळ हास्य व त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारी भावमुद्रा प्रभावीपणे चित्रकार राजेश सावंत यांनी खुबीने आणि सहजतेने चित्रित केली आहे.

लतादिदींच्या वास्तववादी पोट्रेटच्या निर्मितीच्या प्रारंभापासून तर पोट्रेटच्या अंतिम टप्प्याच्या प्रक्रियेतील कुंचल्यांचा कॅनव्हासवरील ओघवता सप्तरंगी प्रवास चित्रफितीतील प्रात्यक्षिकात अवघ्या 4 मिनिटात रसिक अनुभवू शकणार आहेत. हे पोट्रेट पेंटिंग हे अ‍ॅक्रॅलीक रंगमाध्यमात कॅनव्हासवर चित्रित केले गेले आहे. स्वरचित्र चित्रफीत 28 सप्टेंबरला सकाळी 9 वा. 1 मिनिटांनी समाजमाध्यमावर विनामूल्य प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या