Friday, May 3, 2024
Homeनगरयंदा रमजान ईद साध्या पध्दतीने साजरी

यंदा रमजान ईद साध्या पध्दतीने साजरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर रमजान ईद अगदी साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करून घरच्या घरीच ईदच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

गत मार्चला देशात करोनाचा शिरकाव झाला आणि त्याने हा हा म्हणता सर्वांना घेरले. या करोनामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. परिणामी सर्व सण, उत्सवही घरच्या घरीच साध्या पध्दतीने साजरे करण्यात येत आहे.

सध्या करोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. हजारो रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केला त्यामुळे रमजानचा पूर्ण महिला लॉकडाऊनमध्ये गेला. त्यात ईद साजरी करण्याबाबत सरकारने नियमावली जारी केली. सरकारच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी साद देत नियमांचे पालन केले.

गुरूवारी रात्री चंद्रदर्शन झाल्याने काल शुक्रवारी ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरच्या घरीच् पठण केली. त्याचबरोबर नातेवाईक आणि मित्रमंडळींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. नागरिकांनीही या बांधवांना शुभेच्छा दिल्या. करोनाचे संकट दूर होवो, अशी प्रार्थनाही मस्लिम बांधवांनी केली.

उपासकरूंची पाठ!

अक्षय्य तृतीया हा दिवस पितरांना प्रसन्न करण्याचा दिवस. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे कर्‍हा-केळी मांडून पूजन केले जाते तसेच खिर, आमरस, पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर या दिवशी आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना भोजन देण्याचीही प्रथा आहे. पण यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपासकरूनंनी पाठ फिरविली. जे या आजाराने उपचार घेत आहेत. अशांच्या घरी किंवा करोनाचे उपचार घेऊन घरी आले आहेत. पण अन्य व्याधींनी त्रस्त आहेत. अशा ठिकाणी उपासकरू म्हणून जाण्यास अनेकांनी नकार दिला. त्यामुळे उपासकरूनचे भोजन गायींना देण्यात आले आहे. ज्या घरात करोनाचा शिरकाव नाही. किंवा जवळचे नातेवाईक आहेत. तेथेच उपासकरूंनी जाणे पसंत केले. असे दृष्य पहिल्यांदाच दिसले.

- Advertisment -

ताज्या बातम्या