Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्र निवडणूक : अ‍ॅड. नितीन ठाकरे बाराशेहून अधिक मतांनी विजयी

मविप्र निवडणूक : अ‍ॅड. नितीन ठाकरे बाराशेहून अधिक मतांनी विजयी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. मविप्रत ‘प्रगती’च राहणार की ‘परिवर्तन’ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर निकाल हाती लागले असून तब्बल २० वर्षांनंतर मविप्र संस्थेत खांदेपालट झाले आहे…

- Advertisement -

सरचिटणीस पदाची मतमोजणी नुकतीच संपली असून अ‍ॅड. नितीन ठाकरे यांना ५ हजार ३९६ मते मिळाली आहेत. तर नीलिमाताई पवार यांना ४ हजार १३८ मते मिळाली आहेत. म्हणजेच अ‍ॅड. ठाकरे यांचा १२५८ मतांनी दणदणीत विजय झाला आहे.

मविप्र निवडणूक : गड आला पण सिंह गेला

20 वर्षांनंतर परिवर्तन

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत इतिहास घडला असून तब्बल वीस वर्षांनंतर डॉ वसंत पवार व तयानंतर नीलिमा पवार यांची सलग 20 वर्षांची सत्ता अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बिमोड करत खेचून आणली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या