Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाNPL-2023 : नावा चषक क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ

NPL-2023 : नावा चषक क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (NAAWA) आयोजित ‘नावा प्रिमियर लिग’ (NAAWA Premier League) नावा क्रिकेट सामन्यांना आज पासून महात्मानगर येथील स्टेडियमवर सुरुवात झाली. रतन लथ व समीर रकटे यांच्या उपस्थितीत आरंभीच्या सामन्याचा टॉस करण्यात आला. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील १२ संघ या स्पर्धेत सहभागी आहे.

- Advertisement -

पहिल्या दिवशी दिव्य मराठी- पुण्यनगरी, सकाळ-देशदुत, रेड एफ एम-पुढारी, नावा -जनस्थान, दिव्य मराठी-टाईम्स ग्रुप, देशदुत-लोकमत, पुढारी-लोकनामा, जनस्थान- रेडीओ मित, टाईम्स ग्रुप-पुण्यनगरी या संघांमध्ये सामना रंगला. सम्राट गृप या स्पर्धांचे मुख्य प्रायोजक आहेत. सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अ‍ॅन्ड विजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वारियर्स व मिडीया अ‍ॅडव्हर्टायझींग, गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्टस्, फुडस् पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझींग, नवांकुर पब्लिसीटी, पेटूमल, टॉस पार्टनर मयुर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अ‍ॅडव्हर्टायझींग, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझींग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषीदूत बायो हर्बल, ओेमपुजा इलेक्ट्रॉनीक, वेध न्युज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी मैदान उपलब्ध करून दिले आहे. दिव्य मराठी- पुण्यनगरी यांच्यात झालेल्या सामन्यात पुण्य नगरी संघाने ३ गडी गमावून ५० धावांनी सामना जिंकला. दिव्य मराठी ने नियोजित ८ षटकात १० गडी गमावत ४० धावा केल्या. सकाळ-देशदुत यांच्या मध्ये झालेल्या लढतीत देशदूत ने ७० धावा ठोकत सामना जिंकला. रेड एफ एम-पुढारी यांच्यात पुढारीने बाजी मारली. नावा -जनस्थान यांच्यात जनस्थान संघाने बाजी मारली. दिव्य मराठी-टाईम्स ग्रुप यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात दिव्य मराठीने तर, देशदुत-लोकमत लढतीत देशदूत ने बाजी मारली. पुढारी-लोकनामा यांच्यात लोकनामाचा संघ विजेता ठरला.

पंच म्हणुन प्रसाद नवले, सुशांत वाघमारे, आशुतोष शिंदे तर स्कोअरर म्हणुन आकाश सानप यांनी काम पाहिले. स्पर्धा समिती प्रमुख रवि पवार, सचिन गिते व नावा अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, मा. सरचिटणीस दिलीप निकम, सरचिटणीस मिलींद कोल्हे पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दिपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरेे , सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, शाम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार व नावाचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

मॅन ऑफ द मॅच

एकनाथ शिंदे, अमोल घावरे, रवी आखाडे, चिन्मय उदगीरकर, कलीम खान, प्रशांत कुटे, प्रतीक गंगेले.

रविवार चे सामने

जनस्थान – रेडिओ मित, टाइम्स गृप – पुण्यनगरी, लोकमत – सकाळ, लोकनामा – रेड एफएम, रेडिओ मित – नावा

- Advertisment -

ताज्या बातम्या