Monday, May 6, 2024
Homeनगरनगर-बीड-परळी रेल्वेसाठी 400 कोटी

नगर-बीड-परळी रेल्वेसाठी 400 कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय मिळाले, याचा उलगडा झाला नव्हता.

- Advertisement -

मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ‘पिंक बुक’ प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी 449 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर 1212 कोटी रुपये खर्चाच्या पुणे-संगमनेर-नाशिक नव्या मार्गासाठी तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे हा मार्गही रखडणार आहे. आता या मार्गाचे भवितव्य राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी गेल्यावर्षी 449 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आताही तेवढाच निधी प्रस्तावित आहे. नगर ते नारायणडोह या 15 किमी लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर 17 मार्च 2018 रोजी नगर ते नारायणडोह मार्गावर सात डब्यांची गाडी धावली होती. त्यानंतर काही काम झाले. या मार्गासाठी राज्य सरकारही दरवर्षी निधी देत असते. राज्याच्या अर्थसंकल्पात या रेल्वेसाठी किती निधी प्रस्तावित केला जातो याकडे नगरल बीड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाला पाठविलेल्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली होती. त्यामुळे निदान यावर्षी तरी या मार्गासाठी निधी प्रस्तावित केला जाईल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.

या सेमी स्पीड रेल्वेने पुणे नाशिक प्रवास हा फक्त दोन तासांचा होणार आहे. तसेच या रेल्वेमुळे संगमनेर, अकोलेसह नगर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.या रेल्वेमुळे शिर्डी, अशी अनेक तीर्थस्थळे जोडली जाणार आहे. एमआय डीसीना सुद्धा याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

पुणे, हडपसर, वाघोली,कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर नारायणगाव,आळेफाटा, बोटा, जांबूत, साकुर, आंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मूढारी, शिंदे आणि नाशिक रोड असा रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला आहे. 231 की.मी. लांबीच्या या मार्गाचे ड्रोन सर्वेक्षण सुरु असून जवळपास 180 की.मी. चे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या रेल्वेमार्गासाठी 1300 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

शिर्डी-पुणतांबा मार्गासाठी 77 लाख

शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे या मार्गाने रेल्वे मोठ्या प्रमाणात धावत असतात. त्यामुळे या रेल्वेमार्गाची मजबूती व अन्य दुरूस्ती कामे करण्यासाठी 77 लाखांचा निधी देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या