Friday, May 3, 2024
Homeनगरशहर पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा

शहर पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून लॉजचा मालक व मॅनेजरविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद रोडवरील यशांजली लॉजवर तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

राजू सौदे व संजय गाडे (रा. गोविंदपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यशांजली लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यांनी तोफखाना पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने लॉजवर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या