Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी फॅक्टरीजवळ एसटीचे चाक निखळले; प्रवासी बालंबाल बचावले

राहुरी फॅक्टरीजवळ एसटीचे चाक निखळले; प्रवासी बालंबाल बचावले

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

नगर-मनमाड रोडवर (Nagar-Manmad Road) नगरकडून धुळ्याकडे (Dhule) जाणार्‍या एसटी बसचे (ST BUS) चाक निखळले. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून चालकाच्या सतर्कतेमुळे या बसमधील 61 प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना राहुरी (Rahuri) ते राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) या दरम्यान घडली आहे.

- Advertisement -

शनिवार दि. 25 रोजी नगर कडून धुळ्याकडे (Nagar-Dhule Bus) एसटी बस क्रमांक एमएच 11 बीएल 9238 ही नगर-मनमाड रोड (Nagar-Manmad Road) ने राहुरीपासून राहुरी फॅक्टरीच्या (Rahuri Factory) दिशेने सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जात असताना सुतगिरणीच्या जवळ नगर मनमाड रोडवर (Nagar-Manmad Road) या एसटी बसचे ड्रायव्हर सीटखाली असलेले चाक अचानकपणे निखळले त्यामुळे ही बस जवळपास शंभर फूट चाक निखळलेल्या अवस्थेमध्ये घसरत गेली. अचानकपणे आवाज झाल्याने बसमध्ये असलेले 61 प्रवासी बस थांबताच या वाहनातून घाईघाईने खाली उतरले. या वाहनावरील चालक हा अनुभवी असल्याने खरं तर हा होणारा मोठा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे टळला. मात्र, ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. आपण वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे बालंबाल बचावले आहोत, हे लक्षात आल्याने सर्व प्रवाशांनी या वाहनचालकाचे आभार मानले.

नगर-मनमाड रोडवर (Nagar-Manmad Road) झालेले जीवघेणे खड्डे (Pits) या अपघातास जबाबदार असल्याचे सांगत या प्रवाशांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाप्रती आपला संताप व्यक्त केला. नगर-मनमाड रोडवर अपघात होणे नित्याचेच झाले आहे. दोन दिवसापूर्वी राहुरी येथे दोनजणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील नागरिकाने याच दिवशी अपघातांमध्ये आपले प्राण गमावले आहेत. हे खड्डे (Pits) आणखी किती जणांचे जीव घेणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

एसटी बसच्या झालेले अपघातामध्ये (Accident) 61 जण बालंबाल बचावले. मात्र, या अपघाताने मोठे स्वरूप धारण केले असते तर अनेकांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त झाले असते. आतातरी प्रशासनाचे डोळे उघडतील काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी राहुल गाडेकर यांनी सांगितले, हा अपघात केवळ वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे टळला. यामध्ये असणारे सर्वच प्रवासी अक्षरशः घाबरून गेले होते. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन कसे चालवावे? हा प्रश्न वाहनचालकाला असतो. आतातरी प्रशासन व पुढार्‍यांनी याची दखल घेऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी यावेळी सर्वच प्रवासी करत होते. यावेळी सर्वच प्रवाशांचा संताप अनावर झालेला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या