Sunday, May 19, 2024
Homeनगरअकोलेत वाढणार महिला ‘शक्ती’!

अकोलेत वाढणार महिला ‘शक्ती’!

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतचे फेरआरक्षण काल जाहीर झाले.17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे नगरपंचायतीमध्ये महिलांचे प्राबल्य राहणार आहे. या फेर आरक्षणात निवडणुकीची तयारी करीत असणार्‍या काही इच्छुकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे किंवा त्याचे आरक्षण बदलल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातील काही इच्छुक आता लगतच्या प्रभागावर लक्ष ठेऊन आहेत.

- Advertisement -

अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या सदस्य पदाची आरक्षण फेरसोडत काल सोमवारी पंचायत समिती सभागृहात प्राताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे उपस्थित होते.

अकोले नगरपंचायत नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मागील वर्षी निवडणुकीसाठी 10 ऑक्टोबर 2020 रोजी सोडत काढण्यात आली होती. मात्र कोविड प्रादूर्भावामुळे निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही तसेच निवडणूक आयोगाने आरक्षणाबाबत बदल केले असून निवडणूक आयोगाने नागरिकांचा मागास प्रवर्ग व इतर आरक्षण देताना एकूण नगरपंचायत सदस्य संख्येच्या 50 टक्केपेक्षा अधिक आरक्षण असणार नाही असे निर्देश दिले आहे.मागणी वर्षी 27 टक्के आरक्षणाचे अनुषंगाने 4.49 म्हणजे 5 जागा नागरीकांचा मागास प्रवर्ग सदस्य संख्या काढण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने आरक्षण 29.41 टक्के होत असल्याने आता नागरिकांचा मागास प्रवर्ग सदस्य संख्या 4 करण्यासाठी फेरआरक्षण सोडत आज काढण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी दिली तसेच या आरक्षण सोडती बाबत हरकती घेण्यासाठी 18 नोव्हेंबर 2021 पर्यत मुदत असल्याचे सांगितले.

यावेळी पंचायत समिती सभागृहात लहान मुलांचे हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली .एकुण 17 प्रभागात अनु.जाती -1 अनु जमाती -1.नागरीकांचा मागास प्रवर्ग 2 नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला 2,सर्वसाधारण 6 सर्वसाधारण महिला 5 असे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये 50 टक्के महिला म्हणजे 9 महिला सदस्य यांचे प्रभाग राखीव झाले आहेत.

सुरूवातीला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीचे सदस्य पूर्वी पुरुष असल्याने महिला करण्यात आले तर दोन नंबरची अनु.जाती जमातीचे मतदार असलेली प्रभागात म्हणजेच प्रभाग क्र 6 मध्ये अनुसूचीत जाती महिला व प्रभाग 16 मध्ये अनुसूचीत जमाती आरक्षण ठेवण्यात आले तर नंतर राहिलेल्या प्रभागातून नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती च्या दोन जागा भुपेष चौधरी या मुलांचे हस्ते काढण्यात आल्या व नंतर मागीलवेळी महिला आरक्षण असलेले प्रभाग वेगळे करुन राहिलेल्या प्रभागातून नागरिकांचा प्रवर्ग महीला चे दोन जागा कुमारी समिक्षा लोहटे या मुलीच्या हस्ते काढण्यात आले. तर एकुण आरक्षणात महिलांना 50 टक्के आरक्षणात अनु.जाती,जमाती,व ना.म.प्र.अश्या 4 महिला संख्या झाल्याने राहिलेले 11 प्रभागातून 5 महिला आरक्षित करण्याचे असल्याने त्यातून पूर्वी महीला आरक्षण असलेली बाजूला काढल्याने 4 प्रभाग आरक्षित झाले मात्र एक महिला आरक्षण हे मागील वर्षी महिला आरक्षण असलेल्या जागी पुन्हा येणार असल्याने 7 प्रभागाच्या चिठ्ठीतून कुमारी समृद्धी अनिल शिंदे या मुलीने चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले .

यावेळी काढण्यात आलेल्या आरक्षणात प्रभाग क्र 3 सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आल्याने या प्रभागात तयारी करीत असलेले राष्ट्रवादीचे जेष्ठनेते संपतराव नाईकवाडी,(या प्रभागात त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत.) तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय आभाळे, भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. वसंतराव मनकर,मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले,प्रशांत चौधरी,राकेश कुंभकर्ण यांनी निवडणुकीची तयारी सुरु होती .त्या अनुषंगाने त्यांनी तयारीही केली होती. मात्र हा प्रभाग सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने सर्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मागील वेळी अनुसूचीतजमातीसाठी राखीव असलेला प्रभाग 14 यावेळी सर्वसाधारण येण्याचे शक्यतेने अथवा मागीलवर्षी काढलेल्या आरक्षणात ना.म.प्र.आला होता त्यामुळे या प्रभागातुन कॅाग्रेसचे युवा नेते प्रदिपराज नाईकवाडी,अमोल नाईकवाडी, राजेंद्र नाईकवाडी,भाजपाचे शरद नवले,नाना नाईकवाडी,सचिन शिंदे आदि इच्छुक होते. त्याप्रमाणे सर्वानी प्रचार यंत्रणाही कार्यरत होती. आता तोही प्रभाग म्हणजेच 14 नंबर प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला आहे त्यामुळे या सर्व इच्छुकांचा हिरमोड झाला तर यातील काहीजण प्रभाग 15 मध्ये नशिब आजमवण्याची शक्यता आहे.

तसेच विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचा प्रभाग 9 हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे मात्र ते प्रभाग 8 मधून लढण्याची शक्यता आहे तर सर्वाधिक चुरस व उमेदवारांची संख्या ही सर्वसाधारण आरक्षण आलले प्रभाग क्र 5,प्रभाग क्र 7,प्रभाग क्र 8 ,प्रभाग क्र 10 व प्रभाग क्र 15 यामध्ये होण्याची शक्यता आहे.विद्यमान नगरसेवक सचिन शेटे हे प्रभाग 15 मधून इच्छुक असल्याचे समजते तर याच प्रभागतून राष्ट्रवादीचे संतोष नाईकवाडी,कॅाग्रेसचे युवा नेते विक्रम नवले,प्रदिपराज नाईकवाडी,असे अनेक जण इच्छुक आहे .जसजशी निवडणूक जवळ येईल अथवा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर बरेचसे चित्र स्पष्ट होईल. मात्र या आरक्षणाने मातब्बरांचे स्वप्न सद्या तरी धुळीस मिळाल्याचे चित्र आहे .

प्रभाग 1 ते 17 आरक्षण असे..

प्रभाग 1 – सर्वसाधारण महिला प्रभाग 2-सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग 3-सर्वसाधारण महिला प्रभाग 4- नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती प्रभाग 5-सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग 6-अनुसूचीत जाती महिला प्रभाग 7-सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग 8-सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग 9-सर्वसाधारण महिला प्रभाग 10- सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग 11- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग 12-सर्वसाधारण महिला प्रभाग 13- नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती प्रभाग 14-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग 15 – सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग 16- अनुसूचीत जमाती महिला प्रभाग 17- सर्वसाधारण महिला

- Advertisment -

ताज्या बातम्या