Friday, January 23, 2026
Homeक्राईमAhilyanagar : नगर-पुणे महामार्गावर दहशत माजवणारे दरोडेखोर टोळके जेरबंद

Ahilyanagar : नगर-पुणे महामार्गावर दहशत माजवणारे दरोडेखोर टोळके जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || सुप्यातील जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाहनचालकांना कोयता व सुर्‍याचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या दोन टोळ्यांमधील चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांकडून सुपा पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक किरण कबाडी व ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात टोळी जमल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

- Advertisement -

चौकशीत त्यांची नावे यश भाऊसाहेब शिरसाठ (वय 20, रा. गांधीनगर, बोल्हेगाव), अथर्व रमेश सुर्यवंशी (वय 19, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव), साहील अतिफ शेख (वय 21, रा. बोल्हेगाव), विशाल बाबासाहेब पाटोळे (वय 20, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी सांगितली. बोल्हेगाव उपनगरातील 17 वर्षीय तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. तसेच संशयित आरोपींच्या कबुलीजबाबात अदित्य भोसले, चेतन सरोदे, नयन पाटोळे व प्रेम नायर हे चार साथीदार पसार असल्याचे उघड झाले.

YouTube video player

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, अंमलदार विष्णु भागवत, गणेश लोंढे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, बाळु खेडकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, अरूण मोरे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते आदींनी सहभाग नोंदवला.

कशी केली लुटमार ?
संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लुटमारीचा घटनाक्रम सांगितला. संशयित आरोपींनी एका दुचाकीस्वाराला दमदाटी करून त्याची दुचाकी व पिशवी हिसकावून नेली. तसेच 25 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता सुपा टोलनाक्याजवळ ट्रक चालकाला कोयता व सुर्‍याचा धाक दाखवून मोबाईल व रोकड लुटली. त्यानुसार सुपा पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...