Friday, May 3, 2024
Homeनगरनगर-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा

नगर-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा

कर्जत |वार्ताहर| Karjat

कर्जत तालुक्यातून जाणार्‍या व अनेक जिल्ह्यांना जोडणार्‍या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 516 (अ) कामासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी

- Advertisement -

जिल्हाधिकारी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक,कर्जत, श्रीगोंदे,नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी, उपवनसंरक्षक, नगर रचनाकार, वीज विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी आदींची दोन महिन्यात दोन वेळा बैठक घेतली होती.

या रस्ताकामात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्या अडचणी सोडवून रस्ता कामास गती देण्याच्या सूचना आ.पवार यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांकडून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामध्ये रस्त्यासाठी असणारे भू-संपादन,काही गावांच्या पाणीपुरवठा योजना या रस्ता कामास अडथळा ठरत होत्या.

आता हे अडथळे दूर होऊन शेतकर्‍यांच्या भूसंपादनाची रक्कमही आलेली आहे ती रक्कमही टप्प्या टप्प्याने मिळणार आहे.आता या रस्ता कामाचा प्रस्ताव पूर्ण करून दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे.कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही या महामार्गाच्या कामाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आ. रोहित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या