Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : पुण्यातून बांधकाम व्यावसायिक अटकेत

Ahilyanagar : पुण्यातून बांधकाम व्यावसायिक अटकेत

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. रूपेश सूर्यकांत भन्साळी (वय 49, रा. स्वारगेट, पुणे) असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून, त्याला आज (गुरूवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही अटक पुण्यातील बांधकाम व्यावसायिक शैलेश अग्रवाल याच्यासह इतर आठ जणांनी बँकेतून घेतलेल्या 10 कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित आहे. या संशयितांनी कर्ज बांधकाम व्यवसायासाठी घेतले असतानाही ते इतरत्र वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

कर्जाची परतफेड न करता, त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले. अग्रवाल व त्याच्या भागीदारांचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुण्यात धाड टाकून भन्साळी याला बुधवारी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील कर्ज घोटाळा गेल्या काही महिन्यांपासून गाजत असून, यापूर्वी अनेक संचालक, कर्जदारांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 291 कोटी रूपयांचे कर्ज विविध प्रकारे मंजूर करून त्याचा गैरवापर केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखीही अनेकांची चौकशी सुरू असून, इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे. भन्साळीच्या अटकेनंतर इतर भागीदारांचा शोध घेतला जात आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...