Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रNagpur Crime News : धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर दोन प्रवाशांची हत्या

Nagpur Crime News : धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर दोन प्रवाशांची हत्या

नागपूर । Nagpur

नागपूरमध्ये एक धक्कादायक (Nagpur Crime News) घटना घडली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक हादरलं आहे.

- Advertisement -

नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांकावर सातवर प्रवाशी रेल्वेची वाट पाहत होती. तेव्हा अचानक एका मनोरुग्णानं लाकडी रायफटरनं प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. मनोरुग्णानं लाकडी रायफटरनं केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

हा आरोपी फलाटावर लोकांना मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफटरने मनोरुग्णानं हत्या केली आहे. गणेश कुमार डी- ५४ ( दिंडीगुल तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. आरोपीनं निर्घृणपणे हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर पाठलाग करून आरोपीला पकडले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...