Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकAccident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर

Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

येथील समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा (Travels buses and trucks) भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू (Death) झाला असून २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सर्व मयत नाशिक (Nashik) येथील रहिवासी असून मृतांमध्ये काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. नुकतीच मृतांची नावे समोर आली आहेत…

याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गाच्या वैजापूर (Vaijapur) येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ (Jambargaon toll plaza) ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना हा अपघात झाला असून ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

मृतांची नावे खालीलप्रमाणे

१) तनुश्री लखन सोळशे (वय पाच वर्ष, रा. समतानगर, नाशिक

२) संगीता विलास अस्वले (वय ४०, रा. वनसगाव, ता.निफाड)

३) पंजाबी रमेश जगताप (३८, रा. राजूनगर, नाशिक)

४) रतन जमदाडे (वय ४५, रा. संत कबीरनगर, वैजापूर)

५) काजल लखन सोळसे (वय ३२, रा.समतानगर, जि. नाशिक)

६) रजनी गौतम तपासे (वय, ७०, रा.उगाव ता.निफाड, जि. नाशिक)

७) हौसाबाई आनंद शिरसाट (वय, ५८ रा. राजूनगर, नाशिक)

८) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय, १८,.राजूनगर, नाशिक)

९) अमोल झुंबर गांगुर्डे (वय, १८, राजूनगर, नाशिक)

१०) सारिका झुंबर गांगुर्डे (वय,४०, राजूनगर, नाशिक)

११) मिलिंद हिरामण पगारे (वय, ५०, कोकणगाव ओझर, ता. निफाड जि.नाशिक)

१२) दीपक प्रभाकर केकाने (वय,४७, रा. पिंपळगाव बसवंत,ता.निफाड जि.नाशिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या