Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'नमो युवा रन' मॅरेथॉन : नशामुक्त भारत संकल्पासाठी धावले हजारो नाशिककर

‘नमो युवा रन’ मॅरेथॉन : नशामुक्त भारत संकल्पासाठी धावले हजारो नाशिककर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून भाजप युवा मोर्चा नाशिक महानगरच्या वतीने आयोजित नशामुक्त भारत संकल्पासाठी ‘नमो युवा रन मॅरेथॉन’ मध्ये हजारो नाशिककर आज सहभागी झाले. तीन ते पाच किलोमीटर धावून त्यांंनी नशामुक्त भारत संकल्प सोडला.

YouTube video player

तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नशामुक्त भारत हा संकल्प नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेमुळे अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा या उपक्रमा अंतर्गत “नशामुक्त भारत” या संकल्पनेवर आधारीत ” नमो युवा रन मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री महाजन यांच्या हस्ते नमो युवा रन स्पर्धेचे हवेत केशरी रंगाचे फुगे सोडून करण्यात आले.

‘नमो युवा रन मॅरेथॉन’ प्रसंगी आ. देवयानी फरांदे , सीमा हिरे, राहुल ढिकले, भाजप नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी,विजय साने,जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अय्यर, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सुवर्णकन्या कविता राऊत, पूर्वा घिया, मोनिका आथरे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारीे सहभागी झाले होते.

सकाळी अनंत कान्हेरे मैदान त्रंबक रोड, या ठिकाणाहून स्पर्धेची सुरुवात झाली. महाजन यांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व नागरिकांचा उत्साह वाढविला. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांच्या वतीने पांढर्‍या रंगाचे टी-शर्ट, मेडल, सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आले होते. सुमारे २० हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या नोंदणीत १७,५०० हून अधिक नोंदणी झालेली होती.तसेच त्याहून अधिक नागरिक या स्पर्धेमध्ये उस्फुर्तने सहभागी झालेली दिसून आले. तरुणांचा विशेषःत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग व्यापक प्रमाणात दिसून आला त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस प्रशासन अकॅडमीचे देखील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने त्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी होल्डिंग ,बॅनर लावण्यात आले होते. विविध सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नाशिक महानगर अध्यक्ष प्रवीण भाटे, प्रदेश महामंत्री योगेश मेंद, मंडल अध्यक्ष अक्षय गांगुर्डे, संकेत खोडे, अमोल हिंगमिरे, प्रणित सानप, शंतनू निसाळ, पार्थ मानकर, सागर निगळ, रोहन काणकाटे, आदित्य दोंदे, विकास एखंडे, विजय बनसोडे, शहर पदाधिकारी अजिंक्य फरांदे, प्रशांत वाघ, विनोद येवले, प्रविण पाटील, प्रेम पाटील, तुषार नाटकर, रोशन ठोके, हर्षल आहेर, तन्मय आव्हाड, ऋषिकेश पाटील साक्षी दिंडोरीकर, इशा भूमकर, शिल्पा तांबोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संदीप जाधव ( मंत्री गिरीश महाजन ह्यांचे स्वीय्य सहायक) जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, हेमंत पाटील , संदिप फोगत, दिपक निकम पाटील ह्यांनी योगदान दिले.

विजेते
२१ वर्षे आतील मूले – गोविंद पांडे , हृषिकेश वावरे , ईश्वर झिरवाळ,
*वय २१ वर्षे आतील मुली- अर्चना शिवराम , अंजली पंडित , शुभांगी गायकर,
वय ३५ वर्ष आतील युवक – रोहित चौधरी , गणेश बावले , योगेश पाडवी,
वय ३५ वर्ष आतील युवती- रविना गायकवाड दिशा बोरसे साक्षी कसबे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....