Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNanded Rain: नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; मुखेड, रावणगावला ढगफुटी सदृष्य पावसाने गावांना...

Nanded Rain: नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; मुखेड, रावणगावला ढगफुटी सदृष्य पावसाने गावांना पाण्याचा वेढा

नांदेड | Nanded
गेल्या काही तासांपासून मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरु मुसळधार पाऊस सुरु असून पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस कोसळला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सहा गावे पाण्याखाली गेले आहेत. यापैकी २ गावात ८० नागरिक अडकले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने आता या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाला (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले असून लहान होड्या आणि बोटींच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.

उद्गीर, मुखेड तालुक्यांत रविवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. अलीकडेच लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पूरपरिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावे पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, रावणगाव येथील गावठाणात 80 जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे 9 जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले होते.

- Advertisement -

अनेक जनावरांचा मृत्यू
मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांना पुराचा वेढा बसला आहे. जोरदार पावसामुळे अनेक जनावर दगावली, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाला आहे. रावणगाव येथे एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...