Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानंदी दूध पितो ही अफवाच - 'अंनिस'चे आवाहन

नंदी दूध पितो ही अफवाच – ‘अंनिस’चे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दूध सेवन करत असल्याची अफवा ( Rumor has it that Nandi is consuming water and milk )राज्यभरात पसरल्याने शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला.

- Advertisement -

समाजमाध्यमांवर ( Social Media ) महादेवाच्या मंदिरांमध्ये नंदी पाणी व दूध पित असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक शहरासह ग्रामीण भागातही या अफवेचे लोण पसरले. लोकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. अचानक उसळलेल्या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले.

अनेक ठिकाणी महादेवाच्या मंदिरावर रात्री उशिरापर्यंत महिलांची गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. पण काही वेळाने ही फक्त अफवा असल्याचें समोर आले. दरम्यान अंधश्रद्धा निर्मलून समितीने ही घटना अफवा असल्याचे म्हटले आहे. चमत्कार कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हातचलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे.

ह्या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत, ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे. म्हणून भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Maharashtra Superstition Elimination Committee) तर्फे डॉ टी.आर.गोराणे ( Dr. T R Gorane ) व कृष्णा चांदगुडे, समीर शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या