Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारजिल्हयात 10 हजार संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी

जिल्हयात 10 हजार संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

जिल्हयातील 10 हजार 52 संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.नंदुरबार जिल्हयात आज एकाच दिवशी..

- Advertisement -

124 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात नंदुरबार तालुक्यातील 29, शहादा तालुक्यातील 36, नवापूर तालुक्यातील 40, तळोदा तालुक्यातील 1 तसेच जिल्हयाबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 763 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत एकुण 10 हजार 52 संशयित कोरोना रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 134 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

2 हजार 763 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी 1 हजार 398 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्हयात 1 हजार 285 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. जिल्हयाबाहेर 55 रुग्णांवर उपचार सुरु असून 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्हयात आज 124 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील 29, शहादा तालुक्यातील 36, नवापूर तालुक्यातील 40, तळोदा तालुक्यातील 1 तसेच जिल्हयाबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या