Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात 66 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नंदुरबार जिल्हयात 66 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नंदुरबार येथील भरारी पथकाने नववर्षाच्या पार्श्वभुमीवर विशेष मोहिमे अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार

- Advertisement -

दोन गुन्हयामध्ये 3 वाहनासह एकुण 66 लाख 48 हजार रुपयांचा पराज्यातील विदेशी मद्यचा मोठया प्रमाणात साठा जप्त केला आहे.

याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.27 डिसेंबर 2020 रोजी आयुक्त कांतीलाल उमाप, संचालिका उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन आहोळ, अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने खापर ते सागबारा रस्ता मोरंजा फाट्याजवळ महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ (जीजे-06 सीएम 5407) या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये परराज्यातील विक्रीसाठी असलेल्या मद्याचे 20 बॉकस मिळुन आले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे वाहनासह 6 लाख 41 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

तसेच अक्कलकुवा ते खापर रस्त्यावर अक्कलकुवा बसस्थानकाजवळ दोन संशयीत वाहन 1 टाटा कंपनीची (क्र.डीएन 09 एम 9294) पॅक बॉडी असलेला कटेंनर, आयसर (क्र.एमएच 04 एफपी3136) पॅक बॉडी असलेला कंटेनर या वाहनांची तपासणी केली असता वाहनांमध्ये परराज्यातील विदेशी मद्याचे एकुण 506 बॉक्स व परराज्यातील बियरचे एकुण 144 बॉक्स असा एकुण वाहनासह 60 लाख 6 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.

याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई दारुबंदी 1949 कायदाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपींना 6 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सदर कारवाई प्र.निरीक्षक एम.एम.संबोधी, दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, अतुल पी.शिंदे , बबन चोथवे, वाहनचालक हेमंत पाटील, जवान अजय रायते, हर्षल नांद्रे, अविनाश पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपासएम.एम.संबोधी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या