Friday, May 3, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्हयात 1391 उमेदवारी अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्हयात 1391 उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 922 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

यात नंदुरबार तालुक्यातील 473, शहादा तालुक्यातील 649, तळोदा तालुक्यातील 182 तर नवापूर तालुक्यातील 87 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.

नंदुरबार तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या 386 नामांकन दाखल झाले.

तर आतापर्यंत 473 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, तालुक्यातील शनिमांडळ व तिलाली ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड शक्य झाली आहे. शनिमांडळला भाजपा-सेना तर तिलाली येथे भाजपा-सेना-राष्ट्रवादी यांच्यात समझोता झाला आहे.

तालुक्यातील खोंडामळी, कोपर्ली, मांजरे, हाटमोहिदा, भालेर, भादवड, आराळे, कार्ली, कंढरे, काकरदे, शनिमांडळ, खर्देखुर्द, बलदाणे, खोक्राळे, निंभेल, न्याहाली, तलवाडे खुर्द, तिलाली, वैंदाणे, नगाव, सिंदगव्हाण, विखरण या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

आज नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण 386 नामांकन दाखल झाले. आतापर्यंत खोंडामळी येथे 11, कोपर्ली येथे 45, मांजरे येथे 10, हाटमोहिदा येथे 23, भालेर येथे 52, भादवड येथे 38, आराळे येथे 7, कार्ली येथे 37, कंढरे येथे 26, काकर्दे येथे 24, शनिमांडळ येथे 9, खर्देखुर्द 9, बलदाणे येथे 10, खोक्राळे येथे 12, निंभेल येथे 14, न्याहाली येथे 19, तलवाडे खुर्द येथे 32, तिलाली येथे 9, वैंदाणे येथे 30, नगाव येथे 21, सिंदगव्हाण येथे 26, विखरण येथे 9 असे एकुण 473 नामांकन दाखल झाले आहेत.

दरम्यान, शनिमांडळ व तिलाली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना व भाजपा एकत्र आले आहे. प्रत्येकी दोन्ही ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्य आहेत. त्यात चार सदस्य शिवसेनेचे तर पाच सदस्य भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध करण्यात आले आहे

शनिमांडळ मध्ये पहिले चार वर्ष सरपंचपद भारतीय जनता पार्टीकडे आहे तर शेवटच्या वर्षाचे सरपंचपद शिवसेनेकडे येणार आहे. तिलाली येथे एकूण 9 सदस्यांपैकी तीन भारतीय जनता पार्टी, तीन शिवसेना, तीन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सदस्य बिनविरोध करण्यात आले. यात सरपंचपद भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दीड वर्ष राहणार असल्याची माहिती देण्यात आली

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रुचिका पाटील, मुन्ना पाटील, शिवसेनेचे डॉ.सयाजीराव मोरे, युवराज पाटील, अरविंद पाटील, शामराव पाटील, सुधीर पाटील, रमेश माळी, रावण पाटील, सुनील पाटील, भाऊराव पाटील, शांतीलाल पाटील, वसंत पाटील, संतोष पाटील, निलेश पाटील, राकेश पाटील, गजानन पाटील, दिलीप पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, नरेंद्र पाटील यांच्या मध्यस्थीने सदर ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या