Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवा मुहूर्त ठरला! जाणून घ्या तारीख आणि वेळ

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवा मुहूर्त ठरला! जाणून घ्या तारीख आणि वेळ

दिल्ली । Delhi

लोकसभा निवडणुकीचे निकालनंतर देशातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. यावेळी जे राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, एचडी कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू यांनी अनुमोदन दिले. हा १४० कोटी जनतेच्या मनातील प्रस्ताव असल्याच्या भावना शाहांनी व्यक्त केल्या. त्यानंतर संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. येत्या रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राजधानी दिल्लीत पार पडेल.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. सरकारने राष्ट्रपती सचिवालयातून 7000 ते 8000 लोकांसाठी जागा मागितली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधी कार्यक्रमात वकील, डॉक्टर, कलाकार, सांस्कृतिक कलाकार, प्रभावशाली व्यक्ती आणि विविध व्यवसायांशी संबंधित विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. सर्व धर्मातील सुमारे 50 प्रमुख धर्मगुरूंना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय, कामगार, ट्रान्सजेंडर, विकसित भारताचे राजदूत, स्वच्छता कामगार आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे लाभार्थी यांनाही आमंत्रित केले जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या