Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNarhari Zirwal : "जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले"; नरहरी झिरवाळांचा मोठा...

Narhari Zirwal : “जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले”; नरहरी झिरवाळांचा मोठा खुलासा

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे त्यांच्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरील वावरामुळे चर्चेत आले आहेत. महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : गोळीबार प्रकरण चिघळले; संशयितांच्या दाव्यानंतर बडगुजरपुत्रास पोलिसांची नोटीस

YouTube video player

त्यानंतर आज यावर बोलतांना गोकुळ झिरवाळ यांचे वडील नरहरी झिरवाळ यांनी मोठे विधान केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील माझा नेता आहे त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला मी दिल्या होत्या. तिथे त्याला विचारले बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत. म्हणून त्याने निवडणूक (Election) लढविण्याचे सांगितले होते. मात्र, त्याच्याबाबत जो काही संभ्रम तयार झाला होता तो आता दूर झाला आहे. गोकुळ आता जागेवरच आहे, कायमस्वरूपी एका जागेवर राहील, त्याच्याबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जाच असह्य झाल्याने गोळीबार; पोलीस तपासात संशयितांची माहिती

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात (Sharad Pawar Group) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे इनकमिंग सुरु झाले आहे.राज्यभरातून अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी गोकुळ झिरवाळ यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने ते शरद पवार गटात प्रवेश करणार का? अशा चर्चा दिंडोरी विधानसभा मतदारसंघात रंगल्या होत्या. मात्र, आज खुद्द नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिल्याने तात्पुरता का होईना यावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...