नाशिक | प्रतिनिधी | Nashik
द्वारका उड्डाणपुलावर (Dwarka Flyover) रविवारी (दि. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या दोन युक्काचे उपचारादरम्यान निधन (Passed Away) झाले. अनूज घरटे (वय १७, रा. सह्यादीनगर) आणि विद्यानंद कांबळे (वय १६, पाथर्डी फाटा) असे या मुलांचे नाव असून या अपघातात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन सख्या भावडांसह पिता-पुत्राचा समावेश आहे. याप्रकरणी स्टील वाहतूक करणाऱ्या वाहन चालकासह वाहन मालक व स्टील विक्रेत्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) धारणगाव येथून धार्मिक कार्यक्रमावरून घरी परत्तनाऱ्या सिडकोतील सह्याद्रीनगर येथील रहिवाशांच्या बाहनाचा द्वारका उड्डाणपुलावर अपघात झाला होता. या अपघातात संतोष मंडलिक व अतुल मंडलिक या पिता-पुत्रांचा, चेतन पवार, दर्शन घरटे, यश खरात यांचा रविवारी मृत्यू झाला तर दर्शनचा भाऊ अनूज घरटे याचा सोमवारी उपचारादरम्यान, मृत्यू झाला. या गंभीर अपघातात एकूण १२ जखमी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय व खासगी क्षणालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार भारत बोळे यांच्या फिर्यादीनुसार, वाहन चालक-मालक व स्टील विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमएच २५ यु ०५०८ क्रमांकाच्या वाहनातून स्टील वाहतूक करण्यासाठी वाहन मालक अशोककुमार दुर्गानंद यादव (४१, रा. चिंचोळे शिवार, अंबड) यांनी क्षमतेपेक्षा जास्त लोखंडी सळई भरल्या, तसेच स्टील विक्रेता मनोजकुमार मेहरचंद दिमान (४५, रा. द्वारका) याने बेजबाबदारपणे वाहनात स्टील भरले.
तर वाहनचालकानेही ट्रकच्या मागील बाजूला सुरक्षात्मक उपाययोजना न करता वाहन चालवले. या वाहनास रिफ्लेक्टर नव्हते किंवा स्टीलला लाल दिवा अथवा लाल रंगाचा कापड नव्हता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एमएच १५ एफव्ही ५६०१ क्रमांकाच्या टेम्पोचालकास या अवजड वाहनाचा अंदाज न आल्याने ते स्टील वाहतूक करणाऱ्या वाहनावर (Vehicle) आदळले. त्यात स्टील शरीरात शिरल्याने टेम्पोतील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर १३ गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी स्टील विक्रेता दिमान व वाहन मालक यादव यांना अटक केली आहे. तर वाहन चालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले, तपास पोलीस निरीक्षक मोहिते करते आहेत. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.