Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik Accident : ट्रक पलटी होऊन भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा करूण...

Nashik Accident : ट्रक पलटी होऊन भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा करूण अंत

चांदवड | वार्ताहर | Chadwad

येथील चांदवड-मनमाड रस्त्यावर (Manmad-Chadwad Road) आज (बुधवारी) सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. यात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून, आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : मतदानाआधी ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात; मतांचा फुटला मोठा भाव

याबाबत अधिक माहिती अशी की, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. यावेळी हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने अपघात घडला. यात एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समजते. तर चार जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे देखील वाचा : Nashik MC Election Politics : मतदानाआधी मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी राजकीय खेळी; ‘या’ प्रभागात दिला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे (Chandwad Police Station) पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी (Police) तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला करून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...