Saturday, March 7, 2026
HomeनाशिकNashik Accident News : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू (Death) झाला. ही घटना एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा परिसरात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शिवा दत्तू गांगवे हा तरुण २ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास सिन्नर फाट्याकडून एकलहरा रोडने आपल्या घराकडे दुचाकीवरून जात होता. अरिंगळे मळा परिसरात आला असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अर्टिगा कारने (एमएच ०१ बीएफ ९९११) त्याच्या दुचाकीला (एमएच १५ जेटी ५४४४) जोरदार धडक दिली. कारचा वेग प्रचंड असल्याने या धडकेत शिवाच्या डोक्याला, छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी मयत शिवाच्या मावशी पूजा दिलीप जाधव (वय ३४, रा. बजरंगवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक गजराज राजेंद्र जाधव (रा. संभाजीनगर, भोर मळा, नाशिकरोड) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०७ मार्च ०२६ – सत्तेचा समतोल

0
राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या सात जागांसाठीची लढाई सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्या ताकदीनुसार; पण दोन हात न करताच बरोबरीत सुटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे...