Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधारदार शस्त्राने हल्ला; जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

धारदार शस्त्राने हल्ला; जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

रस्ता कोणाच्या वडिलांचा विचारल्याने तिघांनी संगनमत करून एका युवकावर धारदार शस्त्राने (चॉपर) सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घटनातालुक्यातील कोचरगावमध्ये घडली आहे.हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

भरत ऊर्फ संतोष चिंतामण मोंढे (रा. कोचरगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. पवन सुरेश लिलके, सुरेश लिलके अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सोमनाथ लिलके व त्याचा मावसभाऊ संतोष चिंतामण मोंढे (दोघेही रा. कोचरगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी बोलत उभे होते. त्यावेळी संशयित पवन सुरेश लिलके आला. रस्ता तुमच्या वडिलांचा आहे का? असे संशयिताने दोघांना विचारले असता भरत मोंढे त्यास म्हणाला की, मग तुमच्या वडिलांचा रस्ता आहे का?. भरत मोंढेने दिलेले प्रत्युत्तर ऐकून संशयित पवन लिलके यास राग आला.

त्यातून भरत मोंढे व पवन लिलके यांच्यामध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्याने संशयित लिलके याने संतोष मोंढे यास शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर संशयिताने येथेच थांबा, मी परत येतो, असे म्हणत धमकावले. संशयित पवन लिलके हा १० मिनिटांनी संशयित सुरेश लिलके व एका विधीसंघर्षित बालकासोबत घटनास्थळी आले. तिघांनी संगनमत करुन गणेश लिलके व संतोष लिलके यांना मारहाण व शिवीगाळ केली. वाद मिटविण्यासाठी निलेश हिरामण लिलके मध्यस्थी झाले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केली.

संशयित पवन लिलके याने धारदार चॉपरने संतोष मोंढे याच्यावर वर्मी घाव केले. त्यात संतोष मोंढे रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्याच्या घटनेनंतर संशयित तिघे घटनास्थळावरुन पळून गेले. नागरिकांनी उपचारार्थ संतोष मोंढे यास रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने त्यास नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान संतोष मोंढे याचा मृत्यू झाला. जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयित तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र, मोंढे याचा मृत्यू झाल्याने संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ताज्या बातम्या

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या...