Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ भीषण अपघात; बस झाडावर आदळून उलटली,...

Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ भीषण अपघात; बस झाडावर आदळून उलटली, चार प्रवासी गंभीर जखमी

उमराणे | वार्ताहर | Umarane

चांदवडहून मालेगावकडे (Chandwad to Malegaon) जाणाऱ्या एका भरधाव बसचा मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) उमराणे जवळ भीषण अपघात (Accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगतच्या एका झाडाला जोरदार धडक दिली आणि ती पलटी झाली. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, १२ ते १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते.

- Advertisement -

मुरबाड येथून नावी, जळगाव (Jalgaon) येथे निघालेली बस (एमएच १४ एएच ०४८३) मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना, उमराण्याजवळ असलेल्या सोनाई काट्याजवळ (Sonai Kata) हा अपघात झाला. भरधाव वेगामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस १०० ते १५० मीटरपुढे जाऊन रस्त्याच्या खाली उतरली. त्यानंतर ती एका झाडाला धडकली आणि पलटी झाली.यावेळी झाडाची फांदी अडकल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

YouTube video player

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी, सोमा कंपनीची पेट्रोलिंग टीम आणि सामाजिक कार्यकर्ते नंदन देवरे, बंटी बोरसे, अविनाश देवरे, अमित देवरे, भूषण देवरे, किरण मोरे, वालचंद देवरे हे तातडीने मदतीसाठी धावले. यानंतर त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर उमराणे ग्रामीण रुग्णालयाच्या (Umarane Rural Hospital) रुग्णवाहिकेद्वारे गंभीर जखमींना तातडीने मालेगाव (Malegaon) येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ताज्या बातम्या