Friday, May 1, 2026
HomeनाशिकNashik Accident : चाैघांच्या मृत्यूने हळहळ; शहरातील अपघात सत्राने धास्ती

Nashik Accident : चाैघांच्या मृत्यूने हळहळ; शहरातील अपघात सत्राने धास्ती

पसार वाहनचालकांचा शाेध सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात अपघातांते (City Accident) सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणच्या चार अपघातांत चाैघांना आपला जीव गमवावा लागला. १६ वर्षीय मुलासह दोन दुचाकीस्वार महिलांचा (Woman) समावेश आहे. नाशिकरोड उपनगर सातपूर व भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सोहेल साजीद बागवान (१६, रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) हा बुधवारी (दि. ३) विवाहसोहळ्यानिमित्त सिन्नरफाटा भागात आला होता. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरुन घराकडे परतत असतांना नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या चारचाकीने दुचाकीस समोरून धडक दिली. या घटनेत सोहेल बागवान गंभीर जखमी झाला. बेशुध्द अवस्थेत त्याला नजीकच्या जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता मध्यरात्री डॉ. मेरी गट्टल यांनी मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार सानप करीत आहेत.

तर, दुसरा अपघात त्र्यंबकरोडवरील संस्कृती हॉटेल भागात घडला. सोमनाथ बाबुराव वडगे (३५ रा. बेझे फाटा, त्र्यंबकेश्वर) हे ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्र्यंबकरोडवरील (Trimbakroad) संस्कृती हॉटेल परिसरात रस्ता ओलांडत असतांना त्र्यबंकेश्वरकडून भरधाव आलेल्या चारचाकीने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले असता गुरूवारी (दि. ४) उपचार सुरू असतांना डॉ. अखिल चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले. सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद आहे. तपास हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.

नाशिक-पुणे मार्गावरील (Nashik-Pune Highway) दत्तमंदिर सिग्नल भागातील अपघातात माई नितीन भोसले (५२ रा. बालाजीनगर, जेलरोड) यांचा मृत्यू झाला. भोसले या बुधवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास मुलासोबत दुचाकीवर प्रवास करीत असतांना  दत्तमंदिर सिग्नल भागात पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालट्रकने दुचाकीस धडक दिल्याने त्या पडल्या. या अपघातात त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने पती नितीन भोसले यांनी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गुरूवारी (दि.४) उपचार सुरू असतांना डॉ. महेश बनसोडे यांनी तपासून मृत घोषित केले. उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.

तर सुरेखा नंदकुमार छिद्रवार (५३ रा. आदर्शनगर, रामवाडी) या गेल्या ९ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास अशोकस्तंभाकडून द्वारकेच्या दिशेने स्कुटीवर प्रवास करीत असतांना हा अपघात (Accident) झाला. खडकाळी सिग्नल भागात भरधाव स्कूटी घसरल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेत त्याच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुखापत झाल्याने सून विशाखा छिद्रवार यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. गुरूवारी (दि. ४) उपचार सुरू असतांना डॉ. स्पर्श लोंढे यांनी त्यांना मृत घोषीत केले. भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद असून अधिक तपास हवालदार डी. एस. रेहरे करत आहेत.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...