Monday, January 26, 2026
Homeक्राईमNashik Accident News : पोलिसाच्या खासगी वाहनाने दिलेल्या धडकेत मायलेकासह तिघे जखमी

Nashik Accident News : पोलिसाच्या खासगी वाहनाने दिलेल्या धडकेत मायलेकासह तिघे जखमी

संतप्त जमावाकडून कारची तोडफोड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सातपूर (Satpur) येथील अशोकनगर भाजी मार्केटजवळ (Ashok Nagar Bhaji Market) पोलिसाच्या (Police) खासगी वाहनाने दिलेल्या धडकेत मायलेकासह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली घडली. वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) घडल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच; वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (शनिवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास महिंद्रा एसयूव्ही (एमएच १५ केके ३१५७) ही गाडी अशोक नगर भाजी मार्केट परिसरातून वेगाने जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने रस्त्यावर असलेल्यांना जोराची धडक दिली. या धडकेत मायलेकासह तिघे जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime : गोल्ड डिलिव्हरीत दहा लाखांचा ‘झोल’; नामांकित सराफा उद्योगाकडून सायबरकडे फिर्याद

दरम्यान, संबधित गाडी सातपूर पोलिस ठाण्यातील (Satpur Police Station) पोलीस कर्मचारी आबाजी मुसळे यांची असल्याचे समोर आले आहे. मुसळे हे आपली ड्युटी संपवून घरी जात असताना हा अपघात घडला. यावेळी संतापलेल्या जमावाने कायदा हातात घेत मुसळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्या गाडीची (Car) तोडफोड केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ जानेवारी २०२६ – प्रजेची मूलभूत जबाबदारी

0
आज आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस. दरवर्षी हा दिवस समाज उत्साहात साजरा करतो. करायलाही पाहिजे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असा देशाचा जगात लौकिक...