Monday, August 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Accident News : राहुड घाटात भीषण अपघात; दोघे ठार, दोन गंभीर...

Nashik Accident News : राहुड घाटात भीषण अपघात; दोघे ठार, दोन गंभीर जखमी

चांदवड | Chandwad

- Advertisement -

येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात (Rahud Ghat) मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दोन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. चांदवड बाजूकडून मालेगाव (Malegaon) बाजूकडे जाणाऱ्या हाइड्रा क्रेन, ॲप रिक्षा, पिकअप व आयशर यांच्यात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला.

घाटातील तीव्र उतारावर गतिरोधकाजवळ घडलेल्या या विचित्र अपघातात अब्दुल कय्युम अब्दुल रज्जाक (६२) अब्दुल आहिल अब्दुल रहेमान (११) (दोघे रा. मोहनबाबा नगर, मालेगांव) यांचा मृत्यू झाला. तर योगेश अशोक बावीस्कर (२७) व बारकू सुभाष वैद्य (२३) (रा. खडकी ता. मालेगाव) या दोन गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे प्राथमिक उपचार करून दोघा जखमींना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे.अपघातातील हाइड्रा क्रेन घेऊन जाणारा ट्रेलर चालक अनुज संजय सिंह (२२) याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत व जखमींच्या नातलगांनी चांदवड (Chandwad) येथील उपजिल्हा रुग्णालय गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

Voter List SIR : मोठी बातमी! 2 कोटींहून अधिक मतदारांची नावे...

0
मुंबई । Mumbai भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या...