Tuesday, October 6, 2026
HomeनाशिकNashik Accident News : येवला-नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Nashik Accident News : येवला-नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

येवला | प्रतिनिधी | Yeola

येवला-नांदगाव राज्यमार्गावर (Yeola-Nandgaon Road) सोमवारी, (दि. ५) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू (Death) झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मालवाहतूक आयशर आदळली. या अपघातात आयशर चालक श्रीकांत चव्हाण (रा. लातूर) यांचा जागीच ठार झाला.

- Advertisement -

तर गंभीर जखमी मनोज राठोड यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

नागरिकांनी (Citizen) जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा (City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2747 गोण्यांची आवक...