Sunday, May 11, 2025
HomeनाशिकNashik Accident News : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

पेठ | वार्ताहर | Peth

येथील सुतारपाडा (Sutar Pada) नजिकच्या फळी येथे नातेवाईकाच्या लग्नास जाणारे तालुक्यातील खंबाळे येथील तरुणांच्या मोटारसायकलला (Bike) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ तालुक्यातील खंबाळे (Khambale) येथील ३ युवक (Youth) गुजरात मधील फळी ता. कापराडा जि.बलसाड येथे मोटारसायकल क्रमांक एमएच १५ जेके ३७६७ वरून गुजरातकडे जात असतांना कुंभाळे फाट्यानजीक गुजरातकडून (Gujarat) नाशिककडे (Nashik) जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली.

या धडकेत जालिंदर प्रकाश पवार (वय १९) प्रविण शंकर शिंगाडे (य २२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर महेंद्र त्र्यंबक पठाडे (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) शंकर दामू शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुढील तपास पीएसआय बागुल व हवालदार भुसारे करीत आहेत .

दरम्यान, या मार्गावर अपघात (Accident) करून पलायन करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांचा पोलिसांनी शोध लावून कठोर कारवाई करावी. याशिवाय अपघाताची मालिका व हकनाक तरुणांचा बळी जाण्याच्या प्रकारास प्रतिबंध बसणार नसल्याची भावना नागरीकांकडून व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India vs Pakistan : युद्धविराम होताच ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला...

0
नवी दिल्ली | New Delhi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Dolad Trump) यांनी काल (शनिवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यात...