मुंबई | Mumbai
अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) आज (रविवारी) पोलीस कोठडी संपत असल्याने नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला बुधवारी (दि.०१) एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पुढील चार दिवस एसायटीकडून खरातची आणखी कसून चौकशी केली जाणार आहे. अशातच आता एसआयटीच्या रडारवर खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार देखील आले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना एसआयटीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरातने स्थापन केलेल्या ‘शिवनिका’ संस्थेच्या (Shivnika Institute) माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम पार पडले होते. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. चाकणकर यांचे भोंदू खरातसोबत विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच खरातच्या शिवानिका संस्थांवर आणि त्यांच्या वडिलांच्या दशक्रिया विधीच्या पत्रिकेवर शोकाकुल म्हणून रुपाली चाकणकर यांचे नाव होते. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांना राष्ट्रवादीच्या (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा (Resignation) द्यावा लागला होता. यानंतर आता खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले असून, त्यांची देखील एसआयटीकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत त्यांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात. तसेच ‘शिवनिका’ संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवण्यात आला आणि यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता? याचा देखील उलगडा होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातची ‘शस्त्र कुंडली’ उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब





