नाशिक | Nashik
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) पोलिसांनी (Police) अटक केली आहे. खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहे. आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात (Nashik Sessions Court) हजर करण्यात येणार आहे. त्याला न्यायालयाने मंगळवार (दि.२४) रोजी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका
खरात प्रकरणाचा तपास माजी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी करत आहे. गेल्या तीन दिवसांत खरातच्या नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. यात काही आक्षेपार्ह वस्तू, जादूटोण्याचे साहित्य आणि पीडित महिलांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याचे बोलले जात आहे. खरात प्रकरणाचा तपास ज्याप्रमाणे पुढे सरकत आहे त्याप्रमाणे अनेक पीडिता समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याने आशीर्वादाच्या नावाखाली अनेक कुटुंबांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या ‘कुकर्मा’ मागे राजकीय वरदहस्त? रुपाली चाकणकरांवर ‘सेटलमेंटचा’ आरोप!
दरम्यान, अशोक खरातविरुद्ध काही महिलांकडून नव्याने गुन्हे दाखल केल्याने एसआयटीकडून त्याच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत वाढवून मागीतली जाण्याची शक्यता आहे. तपासाचा आवाका मोठा असल्याने आणि गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटी नेमकी किती दिवसाची पोलीस कोठडी मागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच आज न्यायालयात काय घडामोडी घडतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप




