नाशिक | Nashik
दोन दिवसांपूर्वी भाजपने (BJP) आपल्या ९९ उमेदवारांची पहिली (Candidate List) यादी जाहीर केली होती. या यादीत विद्यमान ८० आमदारांना (MLA) पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. तर काही विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर तिकीट न मिळालेल्या उमेदवारांची रीघ लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील पाच पैकी चार उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या मात्र वेटिंगवर आहेत.
हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत
दुसरीकडे चांदवड-देवळा मतदारसंघातून (Chandwad-Deola Constituency) भाजपने पुन्हा एकदा डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले आमदार आहेत यांचे बंधू केदा आहेर (Keda Aher) चांगलेच नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ.राहुल आहेर (Rahul Aher) यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाकडे त्यांच्याऐवजी बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा डॉ.राहुल आहेर यांनाच पुन्हा एकदा संधी दिली. त्यामुळे आता केदा आहेर समर्थकांसह भाजपच्या काही नगरसेवकांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.
हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष
देवळा-चांदवड मतदारसंघातील भाजपच्या देवळा नगरपंचायतच्या (Deola Nagar Panchayat) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशा १५ नगरसेवकांसह २ स्वीकृत तसेच अन्य सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे (Resignation) दिले आहेत. केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उगारल्यामुळे भाजप अडचणीत आली आहे.
हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
दरम्यान, त्याचप्रमाणे भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण (Kishor Chavan) यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच केदा आहेर हे विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चांदवड-देवळा मतदारसंघात दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या (Candidate) मैदानात आमने-सामने येणार आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा