Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik BJP Politics : महापौर पदासाठी भाजप खेळणार 'हा' मोठा डाव; नेमकं...

Nashik BJP Politics : महापौर पदासाठी भाजप खेळणार ‘हा’ मोठा डाव; नेमकं काय घडणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापौरपदासाठी (Mayor Post) भाजपकडून (BJP) धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पारंपरिक आणि सध्या विविध निकषांवर चर्चिल्या जाणाऱ्या नावांऐवजी ऐनवेळी नवा आणि तडफदार चेहरा देऊन आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने शहराच्या कारभाराला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा पक्षाच्याच अंतर्गत गोटात सुरू आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजप मोठा डाव खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापौरपदाचे आरक्षण (Mayor Post Reservation) सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने हे प्रतिष्ठेचे पद मिळवण्यासाठी अनेक जण सक्रिय झाले आहेत. शहरात १२२ नगरसेवकापैकी ६६ नगरसेविका आहेत. त्यात भाजपच्या ४६ असून भाजपची धक्कातंत्र वापरण्याची खासियत ठाऊक असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी चार-पाच नावे असून ही यादी आणखी ताणल्याने १५-१६ नगरसेविकांना संधी मिळण्याची आशा आहे.

YouTube video player

तब्बल आठ वर्षांच्या कालखंडानंतर शहराला महापौर मिळणार असल्याने भाजप या पदासाठी निवड करताना घाई न करता सक्षम, स्वच्छ प्रतिमा असलेल्या महिलेची निवड करेल, असे संकेत पक्षाचे नेते खासगीत देत आहेत. मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर असून रविवारी ते मुंबईत (Mumbai) परतणार आहेत. त्यानंतर पदाधिकार्‍यांनी तयार केलेल्या अहवालाचा आढावा घेऊन सोमवारनंतर महापौरपदाबाबत अंतिम निर्णयाची शक्यता आहे.

दरम्यान, महापौर निवडीपूर्वी सदस्य नोंदणी, गटनोंदणी आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार असून, या पार्श्वभूमीवर पुढील आठवडा नाशिकच्या राजकारणात निर्णायक ठरेल, असे दिसते. उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेतेपदाची निवड या प्रक्रियांना मुख्यमंत्र्यांच्या मायदेशी आगमनानंतरच खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

सध्या महापौरपदासाठी सर्वसाधारण गटातून हिमगौरी आडके, स्वाती भामरे, माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी, दीपाली गिते, योगिता हिरे, चंद्रकला धुमाळ, संध्या कुलकर्णी, जुई शिंदे, नीलम पाटील, रोहिणी पिंगळे, संगीता घोटेकर, जयश्री गायकवाड, श्वेता भंडारी, साधना मटाले, प्रतिभा पवार, छाया देवांग आदी १६-१७ नगरसेविकांच्या (Corporators) नावाची चर्चा सुरू आहे.

केवळ पात्रता हाच निकष

भाजप महापौरपदाची निवड करताना केवळ खुल्या गटातीलच महिलेचा विचार करेल असे नाही तर पात्रता असेल तर अन्य प्रवर्गातील महिलेचाही या पदासाठी विचार होऊ शकतो, असे समजते. अनुभव, शिक्षण, कामाची धडाडी, प्रशासकीय कामांचा अनुभव, शहराच्या विविध भागांबाबतचे सखोल ज्ञान तपासून पाहिले जाणार आहे. शहर कार्यालयात इच्छुकांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या गतिमान झाले आहे.

ताज्या बातम्या

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...