नाशिक : पोलीस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासियांची मानसिकताच कारणीभूत आहे.
कारण जिथे पोलीस तिथे काहीतरी गड़बड़ आहे हे आम्ही देशवासियांनी मनात पक्के करुन घेतले आहे. हे पोलीस तेच असतात जे आरोपिकडून गुन्हा कबूल करुन घेतात.
हे पोलीस तेच असतात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न ऐरनिवर आल्यावर आपला दंडुका बाहर काढ़तात. प्रसंगी आपल्या प्राणांचीही परवा करत नाही. यांना कौटुम्बिक जीवन नसतेच. कारण महाराष्ट्र पोलिस यांचे ब्रिदवाक्यच आहे…सदरक्षणाय खलनिग्रहणाय..
अश्या या पोलीस दलाचा आज स्थापना दिन. या दिनाचा इतिहासही रंजकच आहे.. मुंबई पोलिस दलाची निर्मितीची कहानी फारच रंजक आहे. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी १६७२पासून रक्षक नेमले गेले. भंडारी ब्रिगेड नावाची ही फौज १७ फेब्रुवारी १७७९ मध्ये अधिक शिस्तबद्ध होत त्यातून मुंबई पोलिस दल निर्माण झाले.
पुढे महाराष्ट्र पोलिस दल २ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन.
महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून २०१६ पासून हा ‘स्थापना दिन’ साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या अखत्यारीतील पोलिस जनतेवर अन्याय अत्याचार करीत.
स्वातंत्र्यानंतर पोलिस दलात बरेच बदल झाले, तरी आजही त्यांच्याबद्दल फारसे कोणी चांगले बोलत नाही. यासंबंधी फ. मुं. शिंदे यांची ‘पोलिस नावाचा माणूस’ ही बोलकी कविता आहे. त्यात पोलिसांची व्यथा त्यांनी मांडली आहे.
पोलिस दलाचे ऋण फेडण्यासाठी एकदा तरी पोलिस म्हणून जन्म घ्यावा लागेल. कारण पोलिस म्हणून जगत असताना स्वतः आणि समाज वेगळा नसतोच. त्यात वेळ प्रसंगी समाजासोबतही दोन हात करावे लागतात.
दिवाळी दसरा गणपती हे सण उत्सव तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना…पोलिसांना फक्त एकच सण…कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण..
त्यांच्या अंगावरची वर्दी कोणीही एरागबाळा चढवू शकत नाही ती वर्दी अंगावर चढ़वण्याची पात्रता फक्त त्याच्याच अंगी असते जो त्याग करण्यास सदैव तयार असतो.
अश्या या पोलिस दलाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा आणि मनःपूर्वक वंदन…
जय हिंद…।
वैभव सुरेश कातकाडे, नाशिक