Monday, June 22, 2026
Homeक्राईमNashik Bribe News : जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात; ACB...

Nashik Bribe News : जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात; ACB च्या पथकाची कारवाई

नाशिक | Nashik

गेल्या काही महिन्यांत नाशिक जिल्हा परिषदेत (Nashik Zilla Parishad) लाचखोरीच्या घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराकडून ६ हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना वर्ग १, २ आणि ३ अशा तिन्ही श्रेणीतील अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश साहेबराव दराडे (४२, रा. मखमलाबाद), सागर सतीश रावले (३५, रा. मखमलाबाद) व रवींद्र रामनाथ गायकवाड (२९, रा. चांदशी) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या इगतपुरी उपविभागात कार्यरत असून, इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे ही कारवाई करण्यात आली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी

तक्रारदाराने सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून ठेकेदारीचा परवाना घेतला आहे. त्यांनी पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीची (Grampanchayat) दोन कामे नोव्हेंबर २०२५ मध्ये मुदतीत पूर्ण केली होती. या कामाचे अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी ‘मोजमाप पुस्तिके’वर स्वाक्षरी होणे आवश्यक होते. यासंदर्भात त्यांनी संशयित स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असलेले रावले यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, बिलाच्या २ टक्के म्हणजेच १ हजार रुपये घेतल्याशिवाय संशयित सहायक अभियंता दराडे स्वाक्षरी करणार नाहीत, असे फर्मावले. त्यास दराडे यांनीही दुजोरा दिला.

दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. यानंतर तक्रारीची शहानिशा करुन सोमवार (दि.२७) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तडजोडीनंतर ६ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर इगतपुरी (Igatpuri) उपविभागाच्या कार्यालयात संशयितांनी हे पैसे टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले. यावेळी दराडे यांनी पैसे स्वीकारून ते कनिष्ठ सहायक असलेल्या संशयित (Suspected) गायकवाडकडे सोपवताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही अटक केली.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : ‘मालेगाव पार्टी’ रडारवर; पीडितेची ओळख पुसण्याचा होता कट

तीन वेगवेगळ्या स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश

या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यात लाचेची मागणी रावले याने केली, त्याला दराडे यांनी संमती दिली आणि पैसे गायकवाड याने सांभाळले. या तिघांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, याचा तपास एसीबी करत आहे.

ताज्या बातम्या

Gokul Gite : मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन...

0
नाशिक | Nashik नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) निकालात महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे...