Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या...

Ashok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वयंघोषित दैवीशक्तीचा दावा करणारा भोंदू अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) याला सोमवारी (दि. २७) न्यायालयाने सातव्या गुन्ह्यात २९ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासात ओकस प्रॉपर्टीजच्या कार्यालयातून जप्त केलेली अंगठीची मापे व एका महिलेच्या नावाने सापडलेल्या धनादेशांचा नेमका माग काढला जाणार आहे.

- Advertisement -

खरात याला सातव्या गुन्ह्यात अटक (Arrested) करुन व्हीसीद्वारे न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एन. इचपुराणी यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा एसआयटीचे तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, सहायक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडून सहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तर, दुसरीकडे खरातचे वकील अॅड. सचिन भाटे यांनी युक्तिवाद करुन वारंवारच्या पोलिस कोठडीच्या मागणीला विरोध केला. खरात यांच्याकडे सहा गुन्ह्यात आवश्यक तपास झाला असून तो तपासात सहकार्य करत आहेत, असे भाटे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : ‘मालेगाव पार्टी’ रडारवर; पीडितेची ओळख पुसण्याचा होता कट

त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने (Court) खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, एसआयटीने कॅनडा कॉर्नरवरील ओकस प्रॉपर्टीजच्या कार्यालयात केलेल्या तपासणीत एका महिलेच्या नावाचे धनादेश (चेक) मिळून आल्याचे न्यायालयात सांगितले. हे धनादेश जप्त करुन आता या महिलेचा शोध घेतला जात आहे. ही महिला खरातची साथीदार आहे की तिचीही फसवणूक झाली आहे, याचा तपास करायचा असल्याचे भारती यांनी सांगितले. या चेकमुळे आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरेही समोर येण्याची शक्यता आहे.

त्यातच, खरातच्या कार्यालयातून (Office) स्टीलच्या कडीमध्ये अडकवलेली अंगठी बनवण्याची १३.० ते २४.२ साईजची एकूण ३५ गोलाकार मापे जप्त केली आहे. त्यामुळे अंगठ्यांची ही मापे, महिलांना भुरळ घालून किंवा भीती दाखवून त्यांच्याकडून दागिने उकळण्यासाठी आहेत का? किंवा तो स्वतः विशेष अंगठ्या तयार करून चमत्कार म्हणून विकत होता का? या दिशेने तपासास चालना मिळणार आहे. मात्र, सहा गुन्हे व तपास उलटूनही खरात महिलांना गुंगीसाठी नक्की कोणते रसायन पाजायचा, याचा छडा अद्याप लागलेला नाही. सातव्या गुन्ह्याच्या तपासात तरी या केमिकलचे रहस्य उलगडणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गुंगीकारक पदार्थाचे गूढ कायम

महिलांना गुंगीकारक पदार्थ पाजून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले. मात्र, तो नक्की कोणते द्रव पाजायचा, ते मळकट रंगाचे द्रव काय होते आणि तो ते कोठून आणायचा, याचा शोध सलग सातव्या गुन्ह्यातही पोलिसांना लागलेला नाही. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असले, तरी त्या गुंगीकारक औषधाचे नाव अद्याप निष्पन्न न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोठडी ते कारागृह प्रवास सुरूच

गेल्या ४१ दिवसांपासून अशोक खरातचा प्रवास पोलीस कोठडी ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह असा सुरू आहे. एक गुन्हा संपला की लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले जात आहे. एसआयटीला या सातही गुन्ह्यांत ठोस पुरावे मिळाले आहेत की नाही, याबाबत सध्या गुप्तता पाळली जात असली तरी, दररोज समोर येणारे पुरावे खरातच्या अडचणीत वाढ करणारे ठरत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...