Monday, May 6, 2024
HomeUncategorizedनाशिक शहरात एका दिवसात करोना बाधितांची संख्या दुप्पट

नाशिक शहरात एका दिवसात करोना बाधितांची संख्या दुप्पट

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना संसर्गात बुधवारी (दि.२४) धक्कादायक वाढ झाल्याचे समोर आले. मंगळवारी नवीन रुग्ण ७८ इतके वाढल्यानंतर बुधवारी नवीन रुग्णांची दुप्पट वाढ झाल्याने सर्वाची चिंता वाढली आहे. तसेच या एकाच दिवशी विविध भागात ४८३ संशयित दाखल झाले असुन बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे व कमी जोखमीच्या व्यक्तींतून आता नवीन रुग्ण समोर येत आहे. करोनाचा विळखा संपुर्ण शहराला बसत असुन आता एकुण १८० परिसर व इमारती प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर झाल्या आहे. तर महापालिकेच्या १८ कर्मचार्‍यांना लागण झाली असुन स्मार्ट कंपनीतील एका सेवकांचा मृत्यु झाला आहे.

- Advertisement -

शहरात गेल्या दहा दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असुन १० दिवसात ८५५ रुग्ण वाढले असुन सरासरी ८५ नवीन रुग्ण समोर येत असल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या सर्वच भागात आता नवीन रुग्ण समोर येत असल्याने आता शहरात बहुतांशी भागाला लॉकडाऊनची स्थिती येत आहे. बुधवारी १५६ नवीन रुग्ण वाढल्याने एकाच दिवशी ११ नवीन प्रतिबंधीत क्षेत्र झाले आहे. बुधवारी पेठगल्ली नुरानी चौक जुने नाशिक येथील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

बुधवारी १५६ जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाधीतांत एफसीएच पंचवटी १० वर्षाची बालिका, मखमलाबाद रोड ४९ वर्षीय पुरुष, पंचवटी २८ पुरुष, दिंडोरीरोड १४ वर्षाचा मुलगा, ३५ वर्षाचा पुरुष, पेठरोड २९, ४३ वर्षीय महिला, २५ वर्षीय पुरुष, सप्तश्रृंगीनगर ५२ वर्षीय पुरुष, अंबड २३ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, २० वषीय महिला, गंधवर्र्नगरी ५५ वर्षीय पुरुष, जेलरोड ४७ वर्षीय महिला, इंदिरानगर २० व ४७ वर्षीय महिला, गंजमाळ ५३,६५ वर्षीय महिला, पंचवटी ११ वर्षाचा मुलगा, नाईकवाडी ७६ वर्षीय पुरुष, पंचवटी ५० वर्षीय पुरुष, नाशिक २७ वर्षीय पुरुष, उपनगर ३० वर्षीय पुरुष, पखालरोड ७२ वर्षीय महिला, वासननगर पाथर्डी फाटा ४५ वर्षीय पुरुष, भद्रकाली २६ वर्षीय महिला, काठे गल्ली ५५ व २९ वर्षीय पुरुष, जुने नाशिक ४८ वर्षीय पुरुष, काझीपुरा जुने नाशिक वर्षीय पुरुष, शिवाजीनगर सातपुर ३८ वर्षीय महिला, कुंभारवाडा जुने नाशिक ५६, २०, ३९, ४०, २०, ३५, ४२, ४९, ७५ वर्षीय पुरुष, ६ वर्षाचा बालक, ७, १२, १, साडेतीन वर्षाची बालिका, ४८, ३३, २२, २२, ७०, ३१ वर्षाच्या महिला, एफसीएच पखालरोड ८ वर्षाचा बालक व नानावली जुने नाशिक २७ वर्षाचा यांच्यासह इतर रुग्णांचा यात समावेश आहे.

नाशिक शहरातील करोना संशयित स्थिती

* दि. १५ जुन – १६६

* दि. १६ जुन – १०८

* दि. १७ जुन – २३८

* दि. १८ जुन – ३१६

* दि. १९ जुन – २८२

* दि. २० जुन – २१६

* दि. २१ जुन – २६७

* दि. २२ जुन – २२४

* दि. २३ जुन – १६२

* दि. २४ जुन – ४८३

नाशिक मनपा क्षेत्र स्थिती…

* एकुण पॉझिटीव्ह – १५२८

* पुर्ण बरे झालेले – ५८४

* मृत्यु -७७* उपचार घेत असलेले – ७६७

* प्रलंबीत अहवाल २४१

* प्रतिबंधीत क्षेत्र – १८०

- Advertisment -

ताज्या बातम्या