Friday, November 22, 2024
Homeनाशिकनाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक | Nashik
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवारी (१०) दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी ३ वाजेनंतर शहराच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी अक्षय्या तृतीया निमित्त घराबाहेर खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

नाशिकच्या अंबड, सातपुर, नाशिकरोड, नविन नाशिक, पंचवटी भागात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे ही उन्मळुन पडल्याचे वृत्त समजते. गोविंद नगर या भागातील मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

- Advertisement -

हे ही वाचा : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल जाहीर; दोघांना जन्मठेप तर तिघांची सुटका

अक्षय्य तृतीया असल्याने नागरिक खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली, तसेच हातगाड्या, पदपथांवरील विक्रेत्यांचेही हाल झाले.

सिन्नर शहरासह तालुक्यात अवकाळीचा तडाखा
आज सकाळपासून शहरासह तालुक्यात कधी उन तर कधी ढगाळ वातावरण बघायला मिळत होते. दुपारनंतर वातावरणात प्रचंड उष्णताही वाढल्याचे जाणवत होते. शहरासह तालुक्यातील डुबेरे, मनेगाव परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. तसेच , पुर्व भागातील पांगरी, वावी, शहा, पंचाळे परिसरातही दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन विजांचा कडकडाट सुरु झाला होता. त्यानंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. तसेच नांदुरशिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही काही भागात पावसाच्या सरी बसरल्या.

तालु्क्यातील सरदवाडी, पास्ते, जामगाव परिसरात जोरदार पावसासह गारा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरदवाडी, पास्ते परिसरात मुबलक पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बाग आहेत. या गारांचा फटका बागांना बसण्याची शक्यता आहे. तसेच शेतात साठवण्यात आलेल्या मालाला व चाऱ्यालाही यामुळे फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या