Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकपोलिस आयुक्त शहर गणेशोत्सवमध्ये उत्कृष्ट  मंडळांना पुरस्कार जाहीर

पोलिस आयुक्त शहर गणेशोत्सवमध्ये उत्कृष्ट  मंडळांना पुरस्कार जाहीर

नवीन नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिक शहराचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात परिमंडळ १ व परिमंडळ २ साठी उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रोख स्वरूपात पुरस्कार जाहीर केले आहे. यात परिमंडळ २ ची  परिक्षण समिती सदस्य झोन २ चे उपायुक्त मोनिका राऊत यांनी जाहीर केली.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात परिमंडळ १ व परिमंडळ २ साठी उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रोख बक्षिसे जाहीर केली यात प्रथम , द्वितीय ,तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ असे दोन्ही परिमंडळला  स्वतंत्र बक्षिसे जाहीर केले आहेत.

यात गणेशोत्सव पुरस्कार चे निकष जाहीर केले आहे यात गणेश मुर्ती स्थापना व संरक्षणार्थ केलेली व्यवस्था ( १० गुण) . समाजपोयोगी कार्यक्रम व स्वयंसेवक नेमणूक ( २० गुण ) , पर्यावरण गणेशमुर्ती ( १० गुण) , नियमांचे पालन ( १० गुण) , विसर्जन मिरवणुक नियोजन ( २० गुण) , पारंपारिक वादय स्वरूप व शिस्त ( ३० गुण ) विसर्जन मिरवणुक शिस्त व नियमांचे पालन ( १० गुण ) , मिरवणुकीत सातत्य ठेवणे ( २० गुण ) , विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडणे ( १० गुण) , वादय वेळेत बंद करणे ( १० गुण ) असे एकुण १५० गुण ठेवले आहे .

या मंडळांच्या परिक्षण साठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ २ चे उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्य जाहीर केले या समितीत अंबड विभाग सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख. नाशिकरोड विभाग सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ . नाशिक महानगरपालिका उपायुक्त प्रशांत पाटील,शहर शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग जाधव,सेवानिवृत्त प्राचार्य केशव मोरे .कला शिक्षक जगदीश डिंगे. पत्रकार राजेंद्र शेळके या सदस्यांची समिती जाहीर केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या