नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रविवारी पार पडलेल्या शहर पाेलीस भरतीच्या (City Police Recruitment) लेखी परीक्षेत दाेन प्रश्न हे उत्तरांच्या पर्यायातील संदिग्धता वाढविणारे असल्याचे अधाेरेखित झाले आहे. त्यामुळे या प्रश्नांचे गुण (Mark) उमेदवारांना दिले जाणार असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. तर, सोमवारी रात्री उशिरापर्यंत पेपर तपासणी व गुणतालिका तयार करण्याचे कामकाज सुरु होते.
हे देखील वाचा : Nashik Crime News : उबर कॅबमधून गांजा तस्करी
नाशिक शहर पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत (Written test) संदिग्ध पर्यायांमुळे दाेन प्रश्न बाद करावे लागले आहेत. परीक्षेच्या (Exam) अंतिम उत्तरतालिकेत त्यासंदर्भात माहिती समाेर आणण्यात आली असून ‘कुंभमेळा किती वर्षांनी भरतो’ या प्रश्नाकरीता बारा, सहा, तीन व नऊ असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र, प्रश्नात भारतात अथवा महाराष्ट्रात (Maharashtra) असा उल्लेख नसल्याने बारा व तीन हे दोन्ही पर्याय योग्य ठरले. परिणामी, आयुक्तालयाने हा प्रश्न बाद करुन उमेदवारांना आणखीन एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश
पोलिस भरतीची लेखी परीक्षा रविवारी घेण्यात आली. त्यानुसार नाशिक शहरातील (Nashik City) ११८ रिक्त पदासांठी एक हजार १९७ उमेदवारांची (Candidate) लेखी परीक्षेसाठी निवड झाली. त्यापैकी १५ जणांनी दांडी मारली. या परीक्षेत बुद्धिमत्ता विषयातील प्रत्येकी एक प्रश्न रविवारी (दि. ७) सायंकाळी जारी झालेल्या उत्तरतालिकेत बाद करण्यात आला. तर सोमवारी (दि. ८) दुपारी दोन वाजेपर्यंत संबंधित उत्तरतालिकेवर हरकती नोंद झाल्या.
हे देखील वाचा : Nashik Police Recruitment : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला ‘इतक्या’ उमेदवारांची दांडी
त्यावेळी ‘कुंभमेळा’ (Kumbh Mela) किती वर्षांनी भरतो’ या प्रश्नासाठी पहिल्या उत्तरतालिकेत बारा हा पर्याय योग्य दाखविल्याने आक्षेप घेण्यात आला. प्रश्नात कुंभमेळा कुठे किती वर्षांनी भरतो, याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा उमेदवारांनी केला. आयुक्तालयानेही त्यासंदर्भात पडताळणी केल्यानंतर सुधारित उत्तरतालिका जारी केली. त्यामध्ये संबंधित प्रश्नही बाद करण्यात आला. दोन प्रश्न बाद झाले असून संबंधित प्रश्न सोडविलेल्या उमेदवारांना दोन गुण मिळणार आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा
असा आहे विषय
कुंभमेळा हा ठराविक आवर्तन काळानुसार भारतातील पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री दर तीन वर्षांनंतर एकदा या स्वरुपात बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (गोदावारी व त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार स्वतंत्र तीर्थक्षेत्री भरतो. त्यामुळे ‘कुंभमेळा दर — वर्षांनी भरतो’ या प्रश्नाकरीता भारतात प्रत्येक तीन वर्षांनी तर नाशिकमध्ये अथवा संबंधित तीर्थक्षेत्री प्रत्येकी बारा वर्षांनी अशी दोन्ही पर्याय योग्य ठरतात. त्यामुळे प्रश्न बाद करण्यात आला आहे.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा