Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Crime : १२५ नाशिककरांना हिसका; सायबर चोरट्यांनी अडीच कोटी रुपये लाटले

Nashik Crime : १२५ नाशिककरांना हिसका; सायबर चोरट्यांनी अडीच कोटी रुपये लाटले

२२ प्रकारांतून 'हायरिस्क

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सायबर गुन्ह्यांसंदर्भात (Cyber Crime) एकीकडे जनजागृती सुरु असूनही सायबर चोरटे विविध क्लुप्त्या लढवून आपले ध्येय साध्य करत आहेत. त्यानुसार, नाशिक शहरातील (Nashik City) १२५ तक्रारदारांना जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांत सायबर चोरट्यांनी तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे हाऊस अरेस्टच्या एका गुन्ह्यात सर्वाधिक ४८ लाख रुपये उकळले असून ऑनलाइन खरेदी व बुकिंगच्या गुन्ह्यात ५६ लाख ६३ हजार रुपये वर्ग करुन घेतल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

इंटरनेटच्या (Internet) वाढत्या वापरासोबत चोरट्यांनी (Theives) त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या अज्ञ-ानपणा, त्यांना भिती घालून किंवा पैशांचे प्रलोभन दाखवून चोरटे काही क्षणात आर्थिक गंडा घालत आहेत. त्यामुळे नागरिकांची कष्टाची कमाई संशयास्पद बँक खात्यात जमा होऊन त्यानंतर हजारो बँक खात्यातून इतरत्र वर्ग करुन या आर्थिक व्यवहारांतून नागरिकांना गंडा घातला जात आहे.

YouTube video player

दरम्यान, ऑनलाइन आर्थिक फसवणुका (Online Fraud) सेक्सटॉर्शन, ब्लॅकमेलिंग, आमिष, बदनामी व अटकेची भिती दाखवून शहरात सन २०२५ मध्ये १०४ नाशिककरांसह नागरिकांचे ५५ कोटी ८४ लाख रुपये सायबर चोरट्यांनी उकळले होते. हा सिलसिला सन २०२५ मध्येही सुरुच असून सर्वसामान्यांत मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आवश्यक जागृती नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानुसार, नागरिक अलगद संशयितांच्या जाळ्यात अडकत आहेत.

या २२ प्रकारातील १८ फसवणुकांतून पैसे वर्ग

फॉड ॲप, बनावट वेबसाईट, फ्रॉड कॉल, एनी डेस्क ॲप, रिमोट ॲक्सेस ॲप, मोबाईल बँकिंगचाॲक्सेस व ओटीपी, पीएम किसान योजना, कंपनीच्या नावे फॉड, क्रेडीट कार्ड डेबिट कार्ड, क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीचे आमिष, लोन ॲप, आधारबेस्ड फ्रॉड, जॉब फ्रॉड, वर्क फॉम होम, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन बुकींग, स्टॉक शेअर ट्रेडिंग, सेक्सटॉर्शन, लिंक क्लिक केवायसी, गिफ्ट व्हाऊचर रिवॉर्ड पॉइंट-: कुरीअर, एलआयसी फ्रॉड, एमएनजीएल गॅस, यूपीआय, मॅट्रोमनी, हाऊसअरेस्ट (डिजिटल अरेस्ट) व इतर.

बनावट लिंकला क्लिक न करता व त्याद्वारे बनावट ॲपवर गुंतवणूक न करता खात्रीशिर फर्मची चौकशी करुनच गुंतवणूक करावी. जर फसवणूक झाली तर १९३० या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा. जेणेकरुन संशयितांच्या बँक खात्यात वर्ग झालेली रक्कम ‘फ्रिज्ड’ होते. इंटरनेटचा सावधतेने वापर करावा व कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक

तक्रारदारांची संख्या लुटलेली रक्कम (लाखांत)तक्रारदारांची संख्या लुटलेली रक्कम (लाखांत)
४८,७५००० २१,१४९७७
३,०१३२६ ३,०८१२६
१८,४२९६१ १,८९३००
४७ ६२,५४०३४ २,१६२००
१,७६७७७ १,५७१६४
१२,९९६९३ ५६,६३५००
४, ८०३३५ ५,१२४७९
८३००० १२ ५,९३६४९
२,५९१५४ एकूण १२५ २,५३,२७, ६६५

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जानेवारी २०२६ – मार्ग मोकळा तर झाला..

0
राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले. एकप्रकारे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे...